गट ब – Polity विषयाची संभाव्य उत्तरे

Polity विषयाची संभाव्य उत्तरे

आज झालेल्या गट ब पूर्व परीक्षा पेपर मधील Polity विषयाची संभाव्य उत्तरे खाली दिलेली आहेत एकदा पाहून घ्या

सूचना :- ही संभाव्य उत्तरे आहेत त्यामुळे आयोग हीच बरोबर देईल असे सांगता येत नाही आणि पेपर घेऊन पहा काही Typying Mistakes असू शकतात

भारतात संसद आणि राज्य विधान मंडळांच्या निवडणूका___ द्वारे आयोजित केल्या जातात ?

(1) राष्ट्रपती

(2) राज्य निवडणूक आयोग

(3) राज्यपाल

(4) भारताचा निर्वाचन आयोग ✅

प्रत्येक राज्याला महाधिवक्ता असावा असे कोणत्या कलमात नमूद केले आहे?

(1) कलम 194

(2) कलम 177

(3) कलम 197

(4) कलम 165 ✅

भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमात मुख्यमंत्री यांची कर्तव्ये स्पष्ट केली आहेत ?

(1) कलम 163

(2) कलम 166

(3)कलम 167 ✅

(4) कलम 164

73 व्या संविधान संशोधन अधिनियम, 1993 अनुसार ग्राम पंचायतींना देण्यात आलेल्या नवीन जबाबदान्या.

(a) भूमीसुधार कायदा लागू करणे

(b) वनोद्योग, लघु व कुटीर उद्योगांचा विकास करणे

(c) तांत्रीक व व्यवसायिक शिक्षणाची सुविधा उपलब्ध करुन देणे गावांतील जनतेसाठी मनोरंजनाची व्यवस्था करणे

(d) वरीलपैकी कोणता / कोणते वाक्य बरोबर नाही ?

(1) फक्त (b)

(2) फक्त (d) ✅

( 3 ) फक्त (a) आणि (d)

(4) फक्त (b) आणि (c)

(1) (a) आणि (b)

(2) (b) आणि (c)

(3) (c) फक्त ✅

(4) (b) फक्त

ग्रामसभेच्या रचनेतील अचूक वाक्यांचा समूह बनवा.

(a) गावातील सर्व प्रौढ नागरिकांची मिळून ग्रामसभा तयार होते.

(b) 18 वर्ष पूर्ण करणारा प्रत्येक मतदार ग्रामसभेचा सभासद बनतो.

(c) ग्रामसभेला निवडणूक असते. (d) ग्रामपंचायतीचे सर्व मतदार ग्रामसभेचे सभासद असतात.

पर्यायी उत्तरे :

(1) फक्त (a), (b) आणि (c)

(2) फक्त (b), (c) आणि (d)

(3) फक्त (a), (b) आणि (d) ✅

(4) वरील सर्व

राज्यपाल पदाच्या कालावधीबाबत खालीलपैकी कोणती कथने बरोबर आहेत?

(a) राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत राज्यपाल आपल्या पदावर राहतात.

(b) राज्यपाल स्वखुशीने आपल्या पदाचा राजीनामा देऊ शकतात.

(c) राज्यपालांची नियुक्ती सर्वसाधारणपणे पाच वर्षासाठी असते. (d) दुसरी व्यक्ती पद स्विकारेपर्यंत राज्यपाल आपल्या पदावर राहतात.

पर्यायी उत्तरे :

(1) फक्त विधाने (a), (b) व (c) बरोबर आहेत.
(2) फक्त विधाने (a), (b) व (d) बरोबर आहेत

(3) फक्त विधाने (b), (c) व (d) बरोबर आहेत
(4) सर्व विधाने बरोबर आहेत ✅

खालीलपैकी कोणती समिती पंचायत राज्यासंबंधित नाही ?

(1) अशोक मेहता समिती
(2) राजमन्नार समिती ✅
( 3 ) थंगन समिती
(4) एल. एम. सिंघवी समिती

भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे खालीलपैकी कोण सदस्य होते?

(1) वल्लभभाई पटेल
(2) जवाहरलाल नेहरु
(3) अल्लादी कृष्णस्वामी अय्यर ✅
(4) डॉ. राजेंद्र प्रसाद

राज्य लोकसेवा आयोगाबाबत कोणता /कोणती विधाने बरोबर नाहीत?

(a) भारतीय राज्यघटनेच्या कलम 315 ते 323 मध्ये तरतूद.

(b) हे आयोग राज्यशासन तसेच केंद्रशासनासाठी कार्य करते.

(c) या आयोगाने निवड केलेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या नेमणूका केंद्रशासन करीत असते.

(d) आयोगाच्या अध्यक्ष व सदस्यांच्या नेमणूका राज्यशासनाकडून केल्या जातात. –

पर्यायी उत्तरे

(1) फक्त (a) आणि (b)

(2) फक्त (a) आणि (c)

(3) फक्त (b) आणि (c) ✅

(4) फक्त (b) आणि (d)

भारतीय राज्यघटनेतील खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य ब्रिटिश राज्यघटनेतून घेतलेले नाही ?

(1) सरकारचे संसदीय स्वरूप

(2) सरकारचे मंत्रिमंडळ स्वरूप

(3) कायद्याचे राज्य

(4) समवर्ती सूची ✅


1 thought on “गट ब – Polity विषयाची संभाव्य उत्तरे”

Leave a Comment