शाहू महाराज


जून २६, इ.स. १८७४ – मे ६, इ.स. १९२२

कोल्हापूरचे शाहू व चौथे शाहू नावाने प्रसिद्ध, हे कोल्हापूर राज्याचे इ.स. १८८४-१९२२ दरम्यान छत्रपती होते.

शाहू महाराज सुधारणावादी समाजसुधारक होते.

शाहू महाराजांचा जन्म जून २६, इ.स. १८७४ रोजी कागल येथील घाटगे घराण्यात झाला. त्यांचे नाव यशवंत, त्यांच्या वडिलांचे जयसिंगराव (आप्पासाहेब), आईचे नाव राधाबाई होते.

कोल्हापूर संस्थानाचे राजे चौथे शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्‍नी आनंदीबाई यांनी १७ मार्च, इ.स. १८८४ रोजी यशवंतरावांना दत्तक घेतले, व शाहू हे नाव ठेवले. एप्रिल २, इ.स. १८९४ रोजी त्यांचा राज्यारोहण समारंभ झाला.

राज्याभिषेक झाल्यानंतर इ.स. १९२२ सालापर्यंत म्हणजे २८ वर्षे ते कोल्हापूर संस्थानाचे राजे होते.

मुंबई येथे मे ६, इ.स. १९२२ रोजी त्यांचे निधन झाले.


Leave a Comment