1 मे महाराष्ट्र दिवस

महाराष्ट्र दिन का साजरा केला जातो ?

महाराष्ट्र दिन
  • 1 मे 1960 रोजी संयुक्त महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यामुळे आजचा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो
  • 1 मे 1960 साली तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची मुहूर्तमेढ रोवली गेली
  • महाराष्ट्र दिन हा मराठी माणसाचा दिवस आहे आणि तो मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने साजरा करतात विविध कार्यक्रमांचे आयोजनही या दिवशी केले जाते

इतिहास काय आहे ?

  • मुंबई हे भारतातील एक महत्त्वाचे बंदर म्हणून ब्रिटीशांचा देखरेखीखाली होतं
  • 1917 मध्ये भाषावार प्रांतरचना करण्याची कल्पना प्राध्यापक विठ्ठल वामन ताम्हणकर यांनी लोकशिक्षण मासिकातून मांडली
  • त्यात मुंबई प्रांत मध्य वऱ्हाड आणि हैदराबाद येथे विखुरलेले मराठी एकत्र करून महाराष्ट्राची निर्मिती होण्याची अपेक्षा होती
  • 12 मे 1946 रोजी मराठी साहित्य संमेलनात संयुक्त महाराष्ट्र संबंधीचा ठराव मांडण्यात आला त्याचे अध्यक्ष शंकरराव देव होते
  • या मागणीला चालना देण्यासाठी लगेचच सर्वपक्षीय महाराष्ट्र एकीकरण परिषद भरवण्यात आली
  • परंतु केंद्राच्या “दार समिती ” व ” JVP समिती ” यांनी भाषावार प्रांतरचना भारताचा एकात्मतेच्या दृष्टीने योग्य न वाटल्याने ही मागणी फेटाळली
  • राज्य पुनर्रचना आयोगाच्या शिफारशींना काही मराठी आणि गुजराती भाषिकांच्या कडून होणारा विरोध कमी करण्यासाठी 19 नोव्हेंबर 1955 रोजी काँग्रेस कार्यकारिणीने त्रिराज्य सुचवले
  • राज्य पुनर्रचना आयोगाने महाराष्ट्र मुंबई देण्याचे नाकारले त्यामुळे मराठी माणसाच्या भावना दुखावल्या गेल्या
  • इतर कम्युनिस्ट सोशालीस्ट व प्रजासमाजवादी पक्षातील डावे पुढारी व पक्षांनी संयुक्त महाराष्ट्राचा लढा हातात घेतला

सेनापती बापट
एस एम जोशी
आचार्य अत्रे
कॉम्रेड डांगे
शाहिर अमर शेख
प्रबोधनकार ठाकरे हे चळवळीतील महत्त्वाचे ठरले

  • शाहीर अमर शेख शाहीर अण्णाभाऊ साठे शाहीर गवाणकर यांनी आपल्या कलाविष्काराने मराठी अस्मिता जागृत ठेवली
  • 16 जानेवारी 1956 रोजी जवाहरलाल नेहरू यांनी मुंबई केंद्रशासित प्रदेश असेल अशी घोषणा केली या निर्णयाच्या निषेधार्थ कामगारांचा एक विशाल मोर्चा फ्लोरा फाउंटन समोरील चौकात घेण्याचे ठरले त्यानंतर प्रचंड जनसमुदाय जमला
  • मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे हे आंदोलनाचे घोषवाक्य बनले मोर्चा पोलिसी ताकद वापरून उधळून लावण्यासाठी लाठीचार्ज करण्यात आला मात्र या सत्याग्रही मुळे पोलिसांचे प्रयत्न अयशस्वी झाले
  • पोलिसांना आंदोलकांवर गोळीबार करण्यात आला
  • संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात 105 आंदोलक शाहिद झाले या हुतात्म्यांच्या बलिदानाचे पुढे तो मराठी माणसाच्या आंदोलनांमुळे सरकारने नमते घेऊन 1 मे 1960 रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना केली यांच्या बलिदानामुळे 1 मे हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो

सध्याचे महाराष्ट्र

1 मे 1960 ला सध्याचे महाराष्ट्र म्हणजे
▪️कोकण
▪️मराठवाडा
▪️पश्चिम महाराष्ट्र
▪️दक्षिण महाराष्ट्र
▪️उत्तर महाराष्ट्र आणि
▪️ विदर्भ एकत्र करून महाराष्ट्र राज्याची स्थापना करण्यात आली म्हणून आपण एक मे रोजी महाराष्ट्र दिवस साजरा करतो

  • महाराष्ट्र राज्याची भाषा मराठी आहे हे आपल्याला माहीतच आहे
  • मबई ही महाराष्ट्राची राजधानी असून नागपूर उपराजधानी आहे
  • क्षत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्र हे भारतातील तिसरे क्रमांकाचे राज्य आहे

1 मे जागतिक कामगार दिवस का साजरा केला जातो ?

1 मे जागतिक कामगार दिवस
  • दरवर्षी 1 मे रोजी जगभरातील 80 हून अधिक देशांमध्ये हा दिवस राष्ट्रीय सुट्टीचा दिवस करून पाहायला जातो
  • औद्योगिक क्रांती झाल्यानंतर कामगारांना रोजगार मिळू लागला परंतु त्यांची पिळवणूक होत होती त्या बदल्यात त्यांना खूप राबवून घेतले जात होते
  • या विरोधात कामगार एकत्र आले कामगार संघटनेची निर्मिती झाली त्यानंतर मोठे आंदोलन झाले अधिवेशने झाली व त्याला यश आले
  • या कामगारांची मुख्य मागणी म्हणजे आठ तासात कामाची होती म्हणूनच आज भारतासह जास्तीत जास्त देशांमध्ये एका दिवसात आठ तास काम केले जाते
  • 1891 पासून जागतिक कामगार दिन म्हणून पाळण्यात येतो
  • हा दिवस जगातील कामगारांच्या चळवळीच्या गौरवासाठी पाळण्यात येतो

Leave a Comment

close button