महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोषारी यांचा राजीनामा मंजूर करण्यात आलेला आहे व रमेश बैस हे महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून नियुक्त करण्यात आले आहेत
काही दिवसापूर्वी भगतसिंग कोषारी यांनी राष्ट्रपतींना आपला राजीनामाचा अर्ज सादर केला होता , राष्ट्रपती दौपदी मुर्मु यांनी त्यांचा राजीनामा आज मंजूर केलेला आहे व त्यांनी त्याचबरोबर 13 नवीन राज्याच्या राज्यपालांची नियुक्ती देखील राष्ट्रपती भवनांच्या कडून करण्यात आलेले
यामध्ये महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून रमेश बैस यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे
रमेश बैस हे महाराष्ट्राचे 20 वे राज्यपाल आहेत
कोण आहेत रमेश बैस ?
- रमेश बेस हे छत्तीसगडचे आहेत
- त्यांचा जन्म 2 ऑगस्ट 1947 रोजी छत्तीसगडच्या रायपूर मध्ये झाला आहे
- मध्यप्रदेश विधानसभेचे सदस्य होते
- यापूर्वी ते झारखंड व त्रिपुरा राज्याचे राज्यपाल होते
- स हे छत्तीसगड राज्यातील रायपूर लोकसभा मतदारसंघातून सलग सात वेळा खासदार म्हणून निवडून आले होते
- रमेश 1999 ला अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये केंद्रीय पर्यावरण आणि वनराज्यमंत्री होते
रमेश बैस यांचा देखील झारखंड सरकार व त्यांच्यामध्ये देखील सत्ता संघर्ष दिसून आलेला आहे त्यांनी ” झारखंड वित्त विधेयक 2022 ” ला हे विधेयक त्यांनी तिसऱ्यांदा परत पाठवले होते
महाराष्ट्र सोबतच 13 राज्यपाल बदलले
13 बदललेल्या राज्यपालांची नावे
- रमेश बैस, राज्यपाल, महाराष्ट्र
- लक्ष्मण प्रसाद आचार्य, राज्यपाल, सिक्किम
- सीपी राधाकृष्णनन, राज्यपाल, झारखंड
- बीडी मिश्रा, उपराज्यपाल, लडाख
- बिस्वा भूषण हरिचंदन, राज्यपाल, छत्तीसगढ़
- शिव प्रताप शुक्ला, राज्यपाल, हिमाचल प्रदेश
- गुलाबचंद कटारिया, राज्यपाल, आसम
- निवृत्त न्यायमूर्ती एस. अब्दुल नजीर, राज्यपाल, आंध्र प्रदेश
- कैवल्य त्रिविक्रम, राज्यपाल, अरुणाचल प्रदेश
- अनुसुईया उइके, राज्यपाल, मणिपूर
- एल. गणेशन, राज्यपाल, नागालँड
- फागू चौहान, राज्यपाल, मेघालय
- राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर, राज्यपाल, बिहार
- आरोग्य विभाग भरती फ्री टेस्ट क्रमांक 3 (Arogya Vibhag Bharti Test 3)
- 27 नोव्हेंबेर 2023 चालू घडामोडी टेस्ट (Current affairs 27 November 2023 )
- आरोग्य विभाग भरती फ्री टेस्ट क्रमांक 2 (Arogya Vibhag Bharti Test 2)
- भारतीय गुप्तचर विभागात तब्बल 995 जागांची भरती ! असा करा अर्ज …
- आरोग्य विभाग भरती फ्री टेस्ट क्रमांक 1 (Arogya Vibhag Bharti Test 1)
महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल कोण आहेत ?
रमेश बैस ही महाराष्ट्र चे नवीन राज्यपाल आहेत
रमेश बैस महाराष्ट्र चे कितवे राज्यपाल आहेत ?
रमेश बैस ही महाराष्ट्र चे 20 वे राज्यपाल आहेत
रमेश बैस यांचा जन्म कोठे झाला ?
रमेश बैस यांचा जन्म छत्तीसगाढ च्या रायपूर मध्ये झाला
रमेश बैस हे पक्षाचे सदस्य होते
ते भारतीय जनता पार्टी चे सदस्य होते