भारतीय राज्यघटनेमध्ये घटनेमध्ये उल्लेख नसलेल्या बाबी खाली देण्यात आलेलया आहेत प्रत्येक exam मध्ये यावरती नक्कीच प्रश्न विचारले जातात त्यामुळ नक्की वाचा ही सर्व
धर्मनिरपेक्ष शब्दाचा उल्लेख प्रास्ताविक सोडून इतरत्र नाही.
समाजवादी शब्द केवळ प्रस्ताविकेत आढळतो घटनेत इतरत्र नाही.
घटनेत समाजवादी शब्द चा अर्थ स्पष्ट केलेले नाही.
घटनेच्या सुरुवातीनंतर नागरिकत्व संपादन समाप्ती बाबत स्थायी तरतुदी दिल्या नाहीत.
घटनेत अस्पृश्यता या शब्दच अर्थ स्पष्ट केलेला नाही.
घटनेत कोठेही अल्पसंख्याक शब्दचा अर्थ स्पष्ट केलेला नाही.
घटनेत मार्गदर्शक तत्वाचे वर्गीकरण करण्यात आलेले नाही.
घटनेत घटनाभंग या शब्दाचा अर्थ स्पष्ट केलेलं नाही.
संसदीय विधेयकावर निर्णय घेण्याबाबत राष्ट्रपती वर कोणतेही कालमर्यादा घातली नाही.
उपराष्ट्रपतीला पदावरून दूर करण्याची कारणे घटनेत सांगितली नाहीत.
पंतप्रधानचा कालावधी घटनेनं निश्चित केलेला नाही.
संसदीय शासनव्यवस्थाच्या तत्वाचे वर्णन करणयात आलेले नाही.
घटनेत मंत्रिमंडळ च्या रचनेची तरतूद नाही.
कॅबिनेट शब्दाचा उल्लेख मूळ घटनेत न्हवता.
कॅबिनेट समित्यांचा घटनेत उल्लेख नाही.
महान्यायवादी चा कालावधी घटनेत नाही व पदावरून दूर करण्याची पद्धत पण दिली नाही.
राज्यसभा सदस्यचा पदावधी घटनेत निश्चित करण्यात आलेला नाही.
घटनेत सदस्यांच्या पेन्शन ची तरतुद नाही.
घटनेत लोकसभा अध्यक्ष पदासाठी पात्रता सांगण्यात आलेली नाही.
व्हीप्स चा घटनेत उल्लेख नाही.
CAG चा पदावधी घटनेत निश्चित करण्यात आलेला नाही.
सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशचा पदावधी निश्चित केलेला नाही.
न्यायालय अवमान ची व्याख्या घटनेत केली नाही.
घटनेत कुठेही न्यायिक पुनर्विलोकन या शब्द चा उल्लेख नाही.
उच्च न्यायालय न्यायाधीश च्या संख्या बाबत उल्लेख नाही.
न्यायाधीश पदावधी निश्चित केलेला नाही.
उच्च न्यायालयचा न्यायाधीश होण्यासाठी किमान वयाची पात्रता ठेवली नाही.
घटनेत मुख्यमंत्रीच्या निवडीसाठी व नियुक्तीसाठी कोणतेही विशेष पद्धत सांगण्यात आलेली नाही.
महाधिवक्ता पदाचा कालावधी पद्धत आधार याची तरतूद घटनेत नाही.