कोव्हॅक्सिन व कोव्हिशील्ड या करोना प्रतिबंधक लशींचा काही अटींवर प्रौढांसाठी नियमित बाजारात वापर करण्यास भारताच्या औषध नियामकांनी परवानगी दिली.
तसेच सर्वाना करोना प्रतिबंधक लशीची पहिली व दुसरी मात्रा, तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी वर्धक मात्रा उपलब्ध करून देण्यासाठी असलेली सरकारची लसीकरण मोहीम यापुढेही सुरू राहील.
कोव्हॅक्सिन व कोव्हिशील्ड या लशींना सध्या आपत्कालीन वापरासाठी असलेल्या मर्यादित परवानगीचा दर्जा वाढवून त्यांच्या काही अटींच्या अधीन राहून प्रौढ लोकसंख्येसाठी सामान्य वापर करण्याची परवानगी नियामकांनी दिली आहे.
यापुढे या दोन लशी खासगी रुग्णालयांमध्ये आधीच निर्धारित केलेल्या कमाल किरकोळ किमतीत उपलब्ध असतील आणि लोक त्या तेथून खरेदी करू शकतील.
तर नव्या औषधे व नैदानिक चाचण्या नियम 2019 अन्वये ही मंजुरी देण्यात आली आहे.